Press "Enter" to skip to content

रेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला : रेल्वे आणि सिडकोचे दुर्लक्ष

सिटी बेल लाइव्ह /  पनवेल (वार्ताहर) 🔷🔶🔶🔷

खांदा वसाहतीतील बालभारती जवळील पनवेल- सीएसटी रेल्वे ट्रॅक खालील भुयारी मार्गावरील हाईटगेज शुक्रवारी तुटला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान रेल्वे आणि सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असून याबाबत वारंवार तक्रार करूनही कार्यवाही झाली नसल्याची प्रतिक्रिया नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांनी दिली.
         

बालभारती जवळून पनवेल सीएसटी रेल्वे मार्ग जातो. पनवेल- खांदा वसाहत रोड या ठिकाणाहून जातो. रेल्वे क्रॉसिंगच्या  ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणाहून दुचाकी व चारचाकी वाहने जातात. खांदा वसाहतीतील सिग्नल पासून वळसा यामुळे घालावा लागत नाही. दरम्यान सबवे ची हाईट कमी असल्याने.

याठिकाणाहुन मोठे आणि अवजड वाहने नेता येत नाहीत. जर नजरचुकीने अशी मोठी वाहने आले तर ते भुयारी मार्गात अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे येथे हाईट गेज  बसवण्यात आले आहेत. ते मोडकळीस आले होते, तसेच जीर्ण झाले होते.हाईट गेज वाकल्याने ते कधीही पडून दुर्घटना होण्याची शक्यता नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांनी व्यक्त केले होते. त्यांनी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला होता. परंतु त्याबाबत कोणतीही खबरदारी किंवा कार्यवाही  झाली नाही.

शुक्रवारी हे हाईटगेज तुटुन खाली पडले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. सिडको आणि रेल्वेने अशाप्रकारे खबरदारी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर येथे मजबूत नवे हाईट गेज बसावे अशी मागणी सिताताई पाटील यांनी केली आहे. दरम्यान हाईट गेज रस्त्यावर पडल्याने हा वाहतुकीचा मार्ग बंद झाला. वाहनचालकांना याबाबत माहिती नसल्याने ते याठिकाणी येत होते. त्यामुळे तेथून निघण्यासाठी संबंधितांना मोठी कसरत करावी लागली.         

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.