Press "Enter" to skip to content

जांभूळपाडा येथील कृषीकन्या रसिका फाटक यांचा सन्मान

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुधागड तहसील प्रशासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरव 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)🔷🔷🔶🔶

सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील कृषीकन्या रसिका फाटक यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तहसील प्रशासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

रसिक फाटक या कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबवित आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मली व वाढली अशी एक तरुण स्त्री हवामानाशी संबंधित अडचणी व तत्सम आव्हानांचा सामना करून यशस्वी झाल्याने  तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा देती झाली आहे.  आता ती तिच्या शेतीत नवनवीन तंत्र अवलंबते आहे. आणि उत्पन्न वाढविण्याचे हे यशस्वी मंत्र इतर शेतकर्‍यांना, विशेषत: महिलांना सांगून, दाखवून प्रोत्साहित करते आहे.

   तसेच तालुक्यातील शेतकर्यांना आधुनिक शेती आणि कृषी विकासासंदर्भात मार्गदर्शन करतात. त्यांच्या पर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती देखील पोहचवीत आहेत.  मी शेतकयांसाठी सरकारी योजना, भाज्या लागवड, कडधान्ये, इत्यादींच्या नवीन संकरित जाती, तसेच  मशरूम शेती, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन इत्यादी बाबींबद्दल माहिती व सल्ला देते” असे फाटक यांनी सांगितले. रसिका फाटक यांच्या कृषी व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महसूल विभाग, तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्यातर्फे पंचायत समिती सदस्या सविता हंबीर, तालुका कृषी अधिकारी जे. बी. झगडे व मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.