Press "Enter" to skip to content

रसायनीत महाराष्ट्र युवक काँग्रेसच्यावतीने मशाल मार्च

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔷🔶

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे,उरण विधानसभा अध्यक्ष रोहित घरत यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाला विरोध करण्यासाठी “मशाल मार्च” जेष्ठ नेते अशोक मुंढे व रायगड जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष दीपाली ताई म्हात्रे यांनी ” मशाल मार्च “चे उदघाटन करून चांभालीँ येथुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते मोहोपाडा बाजारपेठ येथे मशाल मार्च काढण्यात आला व निषेध करण्यात आला.

त्याठिकाणी प्रदेश सचिव प्रशांत गायकवाड यांचे मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी केंद्रातील बीजेपी सरकारला नरेंद्र मोदी सरकारला आव्हान केले मन की बात नको कीसान की बात ऐका व नुकताच आपण कामगारांच्या विरोधात मधले जे विधायक काढले आहे ते देखील मागे घ्या ,आपण फक्त ‘अदानी अंबानी की बात कर रहे ‘,हो बस करो देश का किसान तुम्हे माफ कभी नही कर सकता.

  • ” जब जब मोदी जुल्म करेगा सत्ता के हथियारों से*
    चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से”
  • त्या ठिकाणी उपस्थित माजी सरपंच अशोक शेठ मुंढे, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड, रायगड जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष दीपाली ताई म्हात्रे, चांभालीँ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनकर म्हात्रे , रायगड जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर सुखदरे, रायगड जिल्हा युवक काँग्रेस सचिव प्रशांत खाने, खालापूर तालुका एनएसयुआय अध्यक्ष कुणाल जाधव, युवा नेते अक्षय मुंढे, खालापूर तालुका एनएसयुआय कार्याध्यक्ष शायान उस्मानी, युवा नेते कुष्णा झोबांडे, दिनेश पाटील, बॉबी खुरेशी आदि युवकांसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.