Press "Enter" to skip to content

महारक्तदान शिबीरात 80 रक्तपिशव्या रक्त गोळा :
तीघाजणांचे प्लाझ्मा दान


अलिबागमधील विविध सामाजिक संघटनांचे आयोजन 🔷🔶🔶🔷


सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । प्रतिनिधी । 🔷🔷🔶🔶


कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अलिबागमधील विविध सामाजिक संघटनांमार्फत कच्छी भवन, अलिबाग येथे आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात 80 रक्तदात्यांनी प्रतिसाद देत जिल्हा रक्तपेढीतील रक्तसंचय वाढवण्यास मदत केली. विशेष म्हणजे याच शिबीरात तीघाजणांनी प्लाझ्माचे दान केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी कच्छिभवने अध्यक्ष किरण डेडीया, दिनेश शहानंद, अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष अभिजीत पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ किरण नाबर, डायमंड क्लबच्या अध्यक्ष जोत्सना चौगुले, लिओ क्लबचे अध्यक्ष अभिषेक म्हात्रे, जिल्हा रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ दिपक गोसावी, तंत्रज्ञ सुनील बंदीछोड व इतर कर्मचारी सध्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्हा रुग्णालयावर प्रचंड ताण आहे.

रक्तपेढीतील रक्तसाठा कमी कमी होत असून या महिन्यात अजून रुग्णांना रक्त पुरवठा करताना अडचण निर्माण होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी सेवाभावी संस्था व शिबीर आयोजकांनी रक्तदान शिबीराचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णालय रक्तपेढीकडून करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत कच्छी भवन ट्रस्ट अलिबाग, लायन्स क्लब अलिबाग, लिओ क्लब अलिबाग, डायमंड क्लब अलिबाग, रोटरी क्लब अलिबाग, रोट्रॅक्ट क्लब, अलिबाग या सामाजिक सेवा संस्थांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला.

त्यानुसार शुक्रवारी कच्छी भवन, अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. या शिबीरात 80 दात्यांनी रक्तदान करुन जिल्हा रक्तपेढीच्या रक्तसंचय वाढवण्यास मदत केली. शासनाचे सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून हे रक्तदान करण्यात आले.

तीघाजणांचे प्लाझ्मा दान

या शिबीरात कोरोना विषाणुंच्या प्रतिकारासाठी तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीतून प्लाझ्मा दान करण्यासाठी अलिबागमधील सुप्रसिद्ध आर्थोपिडीक्स डॉ चंद्रशेखर साठ्ये, पत्रकार भारत रांजणकर, लायन्स क्लबचे नयन कवळे या तिघाजणांनी पुढाकार घेतला. त्याबद्दल रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ दीपक गोसावी यांनी त्यांना विशेष धन्यवाद दिले. या प्लाझ्मा दानातून एखाद्या कोरोना ग्रस्त रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी मदत होऊ शकेल असा विश्‍वासही डॉ दीपक गोसावी यांनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.