Press "Enter" to skip to content

सुधागडसाठी शुक्रवार ठरला झिरो कोरोना बाधीत रुग्ण दिवस

मात्र एकाचा मृत्यू : आत्तापर्यंत एकूण 20 रुग्णांचा मृत्यू 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔶🔷🔷

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या शासन मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणी नंतर सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसून आले. सुधागड तालुक्यात शुक्रवारी (दि.25) एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. मात्र एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

सुधागड तालुक्यात आठवडा भरातील रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास 1, 3, 4, अशी पहायला मिळाली. शुक्रवार झिरो पॉजीटिव्ह रुग्ण दिवस ठरल्याने सुधागडवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली पालीत स्पेशल टास्क टीम देखील झोकून देऊन काम करीत आहे, याची फलश्रुती होत रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सुधागड तालुक्यात आता पर्यंत कोरोनाचे 379 रुग्ण झाले असून कोरोनाचे 317 रुग्ण बरे झाले आहेत. तर तब्बल 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि 42 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.