सिटी बेल लाइव्ह / रसायनी – राकेश खराडे 🔶🔷🔷🔶
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून १५ सप्टेंबरपासून महाराष्ट्र शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ही मोहिम राबविण्यात सुरूवात केली असून या मोहीमेला वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांकडूनही उत्स्फुर्तं प्रतिसाद मिळत आहे.

तालुक्यात कोरोनाचा सर्वांधिक प्रादुर्भाव वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत दिसून येतो.यासाठी ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना करुन जनजागृती केली आहे.माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे,माजी सरपंच कृष्णा गंगाराम पारंगे तसेच ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विभागांत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून सहा विभागांसाठी विविध पथके नेमण्यात आली आहेत.यासाठी ग्रामपंचायत कमिटी,आरोग्यसेविका घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती घेऊन आॅक्सिमीटरच्या साहाय्याने आॅक्सिजन पातली तपासेन कुटुंबातील नागरिकांना काही आजाराची लक्षणे आहेत का?याची माहिती घेवून नोंद करीत आहेत.शिवाय नागरिकांना आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,हात स्वच्छ धुवावेत,मास्कचा वापर करा,सोशल डिस्टिंक्शन चे पालन करा अशी माहिती दिली जात आहे.माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची असून नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य केल्यास कोरोना संसर्गं हद्दपार होईल असे सरपंच ताई पवार आणि उपसरपंच राकेश खारकर यांनी सांगितले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी’अभियान वासांबे मोहोपाडा हद्दीत यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेवक व इतर कर्मंचारी अथक परिश्रम घेत आहेत.








Be First to Comment