सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔷🔶🔷🔶
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार कर्जत प्रांत कार्यालया तर्फे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
राज्यात सध्या कोव्हिड बाधित रुग्णांची यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रॅक, ट्रीट त्रिसूत्रीचा वापर करून कोविंड प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे असून महाराष्ट्र राज्यामध्ये कोव्हीड-19 या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे कोव्हीड-19 नियंत्रण कारवाई जनतेच्या सहभागातून होणे आवश्यक आहे, त्यामुळे माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि मुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबविण्याबाबत महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या पत्रान्वये सूचना प्राप्त झाल्या आहेत, तसेच माननीय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्जत उपविभागातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी आदी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक प्रांत वैशाली परदेशी-ठाकूर यांनी घेऊन याबाबत नियोजन करण्यात आले.
सदर बैठकीमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी यामुळे अंतर्गत उपविभागातील सर्व शहर, गाव, पाडे, वाड्या, वस्त्या मधील नागरिकांची आरोग्य तपासणी कोमॉबीड आजार असल्यास उपचार प्रत्येक कुटुंबातील नागरिकास व्यक्तिशः भेटून आरोग्य शिक्षण देण्याचे आहे, त्यामुळे मध्ये गृहभेटी देण्यासाठी शहराअंतर्गत वॉर्ड निहाय, गाव स्तरावर गाव निहाय, आरोग्य पथके तयार करण्यात आली आहे. सदर आरोग्य पथकातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने त्यांनी दिलेले दोन स्वयंसेवक असतील.
यामध्ये गृहभेटी द्वारे संशयित कोव्हिड तपासणी व उपचार अति जोखमीच्या व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोव्हीड-19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण (एस ए आर)/आय एल आय) रुग्णांच्या घर भेटीद्वारे सर्वेक्षण कोव्हीड -19 तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत अशी माहिती प्रांत कार्यालयातून देण्यात आली.

–माझे कुटुंब व माझी जबाबदारी 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर पर्यत–
कर्जत ग्रामीण मध्ये स्थापन केलेल्या पथकांची संख्या 137 सर्वेक्षण केलेल्या एकूण कुटुंबाची संख्या 9 हजार 530, तपासणी केलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 41 हजार 320 लक्षणे असलेल्या व्यक्ती 0
कर्जत नगरपरिषद स्थापन केलेल्या पथकांची संख्या 12, सर्वेक्षण केलेल्या एकूण कुटुंबांची संख्या 825 तपासणी केलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 2866,तपासणी केलेल्या एकूण व्यक्तीची संख्या2 हजार 866, लक्षणे असलेले व्यक्तींची संख्या 0
माथेरान नगरपरिषद स्थापन केलेल्या पथकांची संख्या 6, सर्वेक्षण केलेल्या एकूण कुटुंबांची संख्या 590, तपासणी केलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 2 हजार 387 लक्षणे असलेल्या व्यक्तींची संख्या 1
खालापूर ग्रामीण स्थापन केलेल्या पथकांची संख्या 47, सर्वेक्षण केलेले एकूण कुटुंबांची संख्या 7हजाख़र 83, तपासणी केलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 28 हजार 164, लक्षणे असलेल्या व्यक्तींची संख्या 39
खोपोली नगर परिषद स्थापन केलेल्या पथकांची संख्या 31, सर्वेक्षण केलेल्या एकूण कुटुंबातील संख्या 1हजार 240, तपासणी केलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 3 हजार 460, लक्षणे असलेल्या व्यक्तींची संख्या 0
# खालापूर नगरपंचायत स्थापन केलेल्या पथकांची संख्या 4, सर्वेक्षण केलेल्या एकूण कुटुंबांची संख्या 1हजार108, तपासणी केलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 4 हजार 433 लक्षणे असलेल्या व्यक्तींची संख्या 0
कर्जत उपविभागातील लोकांची माझे कुटुंब माझे जबाबदारी कोव्हिडमुक्त महाराष्ट्र यामुळे अंतर्गत तपासणी करण्यात आली आहे, माझे कुटुंब माझे जबाबदारी मोहीम कोव्हीड -19 साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे आपल्या उपविभागात मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊन सर्व संशयित कोव्हीड-19 रुग्ण आणि व्यक्ती यांची तपासणी, चाचणी व उपचार या सेवा तात्काळ देता येतील व आपल्या विभागातील कोव्हीड-19 ची साथ नियंत्रणात आणता येईल.
मोहीमे अंतर्गत नियुक्ती केलेल्या पथकातील अधिकारी, कर्मचारी आपल्या सुरक्षिततेचा विचार न करता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरोघरी फिरत आहेत, उपविभागातील सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्यांची/अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
तरी तपासणी करीता आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी- ठाकूर यांनी कर्जत उपविभागातील जनतेस केले आहे.









Be First to Comment