Press "Enter" to skip to content

चिरनेर जंगल सत्याग्रह स्मृतिदिन साधेपणाने साजरा


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔶🔷🔷

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९३० रोजी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९० वा स्मृतीदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्म्यांना सलामी दिली त्यांनतर उपस्थित मान्यवरांनी स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

१९३० साली चिरनेरचा गौरवशाली जंगल सत्याग्रह लढा गाजला होता. त्यानंतर या लढ्यात हौतात्म्य झालेल्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २५ सप्टेंबर हा दिवस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे, मात्र यावेळी कोरोना महामारीच्या संकटामुळे या वर्षीचा म्हणजे आज साजरा होणारा ९० वा स्मृतिदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा जवानांनी ठीक १२ वाजता बंदुकीतून तीन फैरी झाडत सलामी दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण केले.

यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, सभापती सागर कडू, उपसभापती शुभांगी पाटील, माजी सभापती नरेश घरत, गटविकास अधिकारी नीलम गाडे, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, सरपंच, ग्रामसेवक, इतर शासकीय अधिकारी वर्ग व विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.