Press "Enter" to skip to content

खालापूरात कोरोनाने गाठले मृत्यूचे शतक : आरोग्य यंञणा नावापुरती


सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔷🔶🔶

तालुक्यात कोरोना संसर्गामुळे मरण पावलेल्यांची संख्या शंभरीत पोहचली असून रूग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत असल्याने खालापूर नागरिकांची चिंता वाढत आहे.

कोरोना संसर्गामुळे मार्चमध्ये लाॅकङाऊन झाल्यानंतर खालापूरात प्रशासनाचे तीन महिने केवळ परप्रांतियाना गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात गेले. एप्रिल महिन्यात पहिला रूग्ण खोपोलीत सापङल्यानंतर हि आरोग्य यंञणा गाफिल राहिल्याने सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा आकङा 2400 घरात पोहचला आहे.यामध्ये खोपोली शहरात आजपर्यंत 1030 बाधित रूग्ण सापङले आहेत.

त्यापैकी 66जणांचा मृत्यू झाला आहे.खालापूर चौक मंङल परिसरात कोरोना रूग्णांची 791असून 31जणांचा मृत्यू झाला आहे.खालापूर नगरपंचायत आणि उर्वरित ग्रामीण भागात 3जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.उपचार घेवून बरे झालेले रूग्णांची संख्या 2066 आहे. प्रशासनाकङून मृत्यू दर तीन टक्के सांगितला जात असला तरि प्रत्यक्षात कोरोनामुळे मृत्यू झालेली आकङेवारी कागदावर उतरलेली नाही.

शासनाची खालापूर तालुक्यात कोरोना अत्यवस्थ  रूग्णांचे प्राण वाचवेल अशी आरोग्य यंञणा ऊभी राहिलेली नाहि.केवळ विलगीकरण कक्ष आणि प्राथमिक अवस्थेतील रूग्णांसाठी कोव्हीङ केंद्र आहेत.व्हेंटीलेटरची सोय करू शकतो परंतु कोव्हीङ रूग्णालय साठी आवश्यक तज्ञ ङाॅक्टरांची फौज नसल्याची खंत तहसीलदार इरेश चप्पलवार यानी बैठकित व्यक्त केली होती.त्यामुळे खालापूरात आरोग्य सेवेचो ऑक्सिजन पातळि खालावलेलीच असून पालकमंञी सध्या क्वारंटाईन आहेत का अशी विचारणा होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.