Press "Enter" to skip to content

माथेरानमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी

सिटी बेल लाइव्ह / माथेरान : मुकुंद रांजाणे 🔷🔶🔶🔷

भारतीय परंपरा, शास्त्रे, धार्मिक ग्रंथ आणि तात्विक ग्रंथांच्या चिंतनातून सर्व धर्मांना समान अधिकार देणारा "एकात्मता मानवतावाद" हा विचार भारतीय समाजापुढे मांडला. पेशाने पत्रकार असलेल्या पंडित दीनदयाळ यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत पुष्कळ वैचारिक लेखन केले.

भारतीय जनसंघाच्या स्थापनेवेळी पंडित दीनदयाळ यांनी महासचिव पदी नेमणूक करण्यात आली. पंडितजींनी अंत्योदयाचा विचार मांडला. अंत्योदय म्हणजेच समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहचवणे. त्यांचाच वैचारिक वारसा आज भारतीय जनता पक्ष पुढे नेत आहे.

कला, साहित्य, तत्वज्ञान हीच भारतीय संस्कृती आहे आणि तोच भारतीय राष्ट्रवादाचा पाया आहे, या संस्कृतीमध्ये निष्ठा असेल तर भारत एकात्म होईल, असा विचार मांडणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या जयंतनिमित्त आज माथेरानमध्ये भाजपचे अध्यक्ष विलास पाटील याच्या संत रोहिदास नगर येथील निवासस्थानी साजरी करण्यात आली .

यावेळी भाजप चे जेष्ठ कार्यकर्ते अरविंद शेलार ,संजय भोसले व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या उपस्थित होते. तसेच सचिव संजय भोसले वन ट्री हिल विभागातील घरी साजरी केली .यावेळी भाजपचे सदस्य राजनाथ तिवारी व इतर कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ते उपस्थित होते ,शहर अध्यक्ष विलास पाटीलयांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

तसेच अनमोल आपले विचार सुध्दा यानिमित्ताने व्यक्त केले.यावेळी विजय सुर्वे ,संतोष सावंत, रेखा सावंत, अरविंद शेलार, प्रणिता भोसले, राजनाथ तिवारी , वैष्णवी पाटील, पाटील ,धनश्री पार्टे यासंह अन्य नागरिक मोठया संख्येने सोशल डिस्टनिंग ठेवून उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.