सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔶🔷
रसायनी परीसरातील तुराडे, जुनी पोसरी,देवलोली,सावळे, वावेघर, दापिवली,खाने आंबिवली,आली आंबिवली,मोहोपाडा,चांभार्ली आदी गावातील जवलपास सोलाशे एकरपेक्षा जास्त जमिन सन १९६२ मध्ये केंद्र सरकारच्या एचओसीने सातशे ते आठशे रुपये एकरी खरेदी केली.यानंतर सन १९६५ मधील काही जमीन एच ओसीने एमआयडीसीला हस्तांतरित केली.सन २००० नंतर एचओसीची बिकट अवस्था झाल्याने त्यातील काही जमीन इस्त्रोने घेतली तर उर्वरित बिपिसिएलला देण्याची चिन्हे स्पष्ट होती.
या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रसायनी पाताळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी गेल्या कित्येक वर्ष न्यायालयीन लढा देत आहे.याअगोदर प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर मोजमाप करण्यासाठी आलेल्या अधिका-यांनाही प्रकल्पग्रस्तांनी पलवून लावले होते.परंतु बिपिसिएल कंपनीचे काम पुन्हा पोलीस बंदोबस्तात सुरू होणार असल्याचे समजताच प्रकल्पग्रस्त शेतकरी दापिवली थांब्याजवळ जमले.

यावेळी सदरच्या कामांना स्थानिकांकडून कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचे ठरविले. त्यानंतर एचओसी कंपनी गेटवर जाऊन बिपिसिएल अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व कामे बंद करण्याची प्रकल्पग्रस्तांनी विनंती केली. यावेळी केंद्र सरकारकडून पोलिस बंदोबस्त घेण्याचे आदेश आल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण परिसरातील जमिनीला पोलिस बंदोबस्तात कुंपनाचे काम येत्या सोमवार पासून चालू होणार असल्याचे समजले.
उत्तरादाखल बिपिसिएलच्या प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या शासन प्रलंबित आहेत त्यावर निर्णय कधीतरी होईलच. बिपिसिएल कंपनी खरेदी केलेल्या सर्व जमिनीवर कुंपण घालणारच. एचओसीने दिलेल्या पब्लिक प्रिमाईस ऍक्ट १९७१ च्या नोटीस देखील बरोबरच आहेत.असे म्हणणे शासकीय अधिकाऱ्यांकडून आल्यावर प्रकल्पग्रस्त शेतकरी समीर खाने यांनी पोलिस बंदोबस्तात आमच्या शेतजमिनीला BPCL कुंपण घालेल उद्या बंदोबस्तात गावासहित घरेदारे एच ओसी किंवा इतर कोणतीतरी कंपनी तोडेल मग आम्ही शेकऱ्यांनी कोणत्या रस्त्यावर भिक मागायची ??? हा प्रश्न विचारला ?
त्यावर प्रांताधिकाऱ्यांना राम राम ठोकत उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी सभात्याग केला.
त्यांनतर माजी आमदार विवेकानंद पाटील व आमदार बाळाराम पाटील यांची भेट घेऊन यावर चर्चा व नियोजन केले. संध्याकाळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची भेट घेऊन आजच्या घटनांवर व उद्याच्या बैठकीबाबत चर्चा केली.
सकाळपासून परिसरातील शेतकरी, रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.








Be First to Comment