सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔶🔷🔷
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह २० जण सापडले आहेत. ७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज २ जण मयत आहेत.
आज एकूण पॉझिटीव्ह १८१०, उपचार करून बरे झालेले १५२९, उपचार घेणारे १९२, मयत ८९/असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज भेंडीबाजार उरण १, पिरकोन १, नवीन शेवा १, नवघर १, विंधणे १, एमएसईबी उरण १, जसखार १, बोरी १, धुतुम १, बालई रोड १, केगाव १, डाऊर नगर १, नेवल स्टेशन करंजा १, वेश्वि १, उरण १, ओएनजीसी ३, मुळेखंड १ असे एकूण २० जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. मुळेखंड २, शेवा १, नागाव १, कामठा १, नवापाडा करंजा १, विंधणे १ असे एकूण ७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर नवापाडा करंजा १ व चिरले १ असे २ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याचबरोबर मयतांचा आकडा ही वाढत चालला आहे. बदलत्या वातावरणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.








Be First to Comment