सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔶🔶🔷🔷
माथेरान मध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस थोड्याफार प्रमाणात का होईना वाढत चालली आहे त्यामुळे स्थानीक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर काहींना जर का अधिक प्रमाणात त्रास जाणवू लागल्यास माथेरान बाहेर अर्थातच पनवेल ,मुंबई या ठिकाणी न्यावे लागत आहे अशावेळेस ताबडतोब बेड उपलब्ध होत नसतात त्यावेळी येथील माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर हे मागील पाच महिन्यांपासुन जातीने हजर राहून सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी तत्परता दाखवत आहेत.
ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.अशांची ( दवाखान्याचे बील ) कमी करण्यासाठी सुध्दा प्रयत्न करीत आहेत.
त्यामुळे अनेक रुग्णांना याचा लाभ झाला असून आर्थिक बचत सुध्दा झाली आहे.
माथेरान मधील बहुतांश नागरिकांना बाह्य जगाचे ज्ञान नाही त्यामुळे घरातील एखाद्या रुग्णाला मुंबई अथवा पनवेल या ठिकाणी न्यावयाचे झाल्यास खूपच अडचणी निर्माण होतात. रुग्णाला कुठल्या दवाखान्यात हलवावे याबाबत पुर्णतः गोंधळून जातात. परंतु आपल्या ओळखीच्या माध्यमातून कोणत्याही रुग्णाला मुंबईमधील चांगल्या दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये ताबडतोब बेड उपलब्ध करून देण्यासाठी अनेकांना आजवर मनोज खेडकर यांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे इथल्या रुग्णांचे खेडकर हे एकप्रकारे आधारकार्ड बनले आहेत.
राजकीय क्षेत्रांत वावरताना सुध्दा खेडकर यांनी विविध प्रकारच्या कामात मदत तसेच अनेकांना लाभ मिळवून दिला आहे. कदापिही पक्षभेद न करता आपण या गावातील भूमिपुत्र असून या गावच्या लोकांची सेवा करणे हे आपले परमकर्तव्य मानून पुर्णतः झोकून देत आहेत. त्यामुळे सध्या जरी इथे कोरोना रुग्ण वाढत असले तरीसुद्धा केवळ मनोज खेडकर यांचाच आपल्याला अन्य ठिकाणी दवाखान्यात जाण्यासाठी एकमेव आधार असल्याने नागरिक सहसा घाबरत नाहीत.
त्यांच्या निष्काम अन निस्वार्थ कार्यपद्धतीमुळेच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या लहानशा गावाला प्रत्येक कार्यात मग ते शैक्षणिक असो, सामाजिक क्षेत्र असो वा वैद्यकीय क्षेत्र असो अशावेळी मदतीला धावून येणाऱ्या मनोज खेडकर यासारखे खंबीर नेतृत्व आगामी काळात सुध्दा लाभावे असे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे यांनी सांगितले.








Be First to Comment