Press "Enter" to skip to content

कोडंगाव ग्रामपंचायतीत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेचा शुभारंभ

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔶🔷🔷🔶

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागोठण्याजवळील कोंडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेचा ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आला.

यावेळी सरपंच निखिल मढवी, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अनंत वाघ, गोविंद हंबीर, सदस्या निर्मला मढवी, सोनल वाघ, ग्रामसेविका विद्या घरत, आशा सेवीका चित्रा मढवी, प्रीती बुरूमकर, अंगणवाडी सेवीका. रेणुका मढवी, रसीका धामणे, करिश्मा धामणे, पुजा बांगारे, ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सरपंच निखिल मढवी म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. तसेच आपले गाव आपली जबाबदारी या पद्धतीने सहकार्य मिळाले तरच कोरोना महामारी हटविण्यात यश मिळेल.

आगामी काळात येणारे सण, यात्रा साजरे करायचे असेल तर कोरोना हा संसर्ग रोग गावागावातून पुर्णपणे नष्ट झाला पाहीजे असे शेवटी मढवी यांनी सांगितले.

दरम्यान प्रारंभी अंगणवाडी सेविका,आशासेविका, यांच्या एकुन चार टीम तयार करण्यात आल्या असून त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच निखील मढवी याच्यां हस्ते आरोग्य तपासणी करण्याकरीता थर्मल मशिन, ऑक्सिमीटर , सॅनिटायजर, तापमाफक यंत्र देण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.