Press "Enter" to skip to content

उरणमधील मराठ्यांचा एल्गार : समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) 🔷🔷🔶🔶

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलन सुरू आहे. आज उरणमधील मराठा समाजातर्फे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे लढा सुरू आहे. हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी मराठा समाजातर्फे प्रयत्न सुरू आहेत. आरक्षणाला मंजुरी मिळावी यासाठी मराठा समाजातर्फे शासनाने मराठा समाजावर होणारा अन्याय दूर करण्याकरीता राज्यभर सूरू आसलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर समाज बांधव आपल पाठबळाचे प्रदर्शन करीत आहेत . या संदर्भात आज राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहे.

उरणमधील मराठा समाजातर्फे आज तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन सादर करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी केली आहे.

यावेळी तालूका अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक देशमुख, सुनील चव्हाण, आनूजा चव्हाण, राऊत मॅडम आदीं उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.