सिटी बेल लाइव्ह / प्रतिनिधी (सारडे ) 🔶🔷🔷🔶
संकल्प हा निसर्ग वाचविण्यासाठी , संकल्प हा , पर्यावरण संवर्धन चा निसर्गाच्या संरक्षणा साठी सर्व काही ही वसुंधरा प्रफुल्लित व वृक्षाने सजलेली असावी हाच उद्देश , लोक वाढदिवस दारू , पार्टी करून उगाच किती तरी पैसे देऊन करतात परंतु केळवणे गावातील शशिकांत ठाकुर यांनी आपला मुलगा करण ठाकूर याचा १५ वा वाढदिवस हा केळवणे डोंगरात वृक्षारोपण करून साजरा केला आणि सर्वांपुढे एक वृक्षारोपण आणि संवर्धन याचा आदर्श निर्माण केला.

ही भूमिका जर सर्वांनी घेतली तर हे ओसाड पडलेलं डोंगर हे झाडांनी बहरायला वेळ लागणार नाही आणि पर्यावरण हे अतिशय उत्तम राहील या साठी शशिकांत ठाकूर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकावर वृक्षारोपण प्रसंगी सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे , समाधान पाटिल , प्रदिप ठाकुर ,नवनीत पाटील शशिकांत ठाकूर यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता तसेच भविष्यात आपल्या मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येतील असे शशिकांत ठाकूर यांनी जाहीर केले








Be First to Comment