सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव / पाताळगंगा : 🔶🔷🔷🔶
मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने मराठा समाज पुन्हा एकवटला असून शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज खालापूर तालुक्याच्या वतीने खालापूर तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करीत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा बांधवांनी आपल्या समोर उभ्या राहणाऱ्या समस्या व्यक्त करीत मराठा समाजाच्या आरक्षणाची स्थगिती सुप्रिम कोर्टाने हटवा अशी मागणी करण्यात आली.
आरक्षणासाठी मराठा समाजानी अनेक वर्षापासून आंदोलनाचा धङाका लावला आहे. २०१८ मध्ये संपूर्ण महाराष्ट्र भर क्रांतीदिनी झालेल्या आंदोलनानंतर तत्कालीन सरकारला आरक्षणावर शिक्कामोर्तब करावे लागले होते. परंतु नुकतीच सुप्रीम कोर्टानी आरक्षणाला स्थगिती दिली आणि त्यातच राज्य सरकारने पोलिस भरतीची घोषणा करुन मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. संतापलेला मराठा समाजाकङून खालापूर तहसील कार्यालय समोर २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले असून याप्रसंगी मराठासाठी बलिदान दिलेल्या समाज बांधवाना श्रध्दाजंली वाहण्यात आली.
याप्रसंगी खोपोली च्या उपनगराध्यक्षा विनिता कांबळे नगरसेवक सुनील पाटील, मनीष यादव, अमोल जाधव , नगरसेविका वैशाली जाधव, माधवी रिठे, प्रमिला सुर्वे ,कविता खोपकर, अनिल चाळके, अंकित साखरे जितेंद्र सकपाळ, मनोहर देशमुख, गजानन मांडे, सचिन कर्णूक, अनिल मिंडे, अविनाश तावडे, तात्या रिठे , राजेश पाटील , मंगेश पाटील, राजेश पारठे, किरण हडप ,अंकुश हडप, राजू ढोकले, दीपक जगताप,माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव,अदि मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थितीत होता.








Be First to Comment