Press "Enter" to skip to content

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पेण तहसीलदारांना निवेदन

सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे ) 🔶🔷🔷🔶

मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत आज राज्यभर ठिय्या आंदोलन करण्यात आले.त्याच अनुषंगाने पेणमधील मराठा समाजाच्या वतीने सकाळी ठिय्या आंदोलन करून तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात विशेष करून मराठा आरक्षण खंडित होऊ न देता पूर्ववत चालू ठेवावे, कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली त्याप्रमाणे रोहा – तांबडी येथील आरोपींना फाशी द्यावी, SEBC प्रवर्गातील घटकांना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती सुरू ठेवाव्यात, बाधित झालेल्या राज्यसेवेतील उमेदवारांना शासन सेवेत सामावून घ्यावे, नवीन कर्ज प्रकरणांसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, आंदोलनातील निरपराध तरुणांवरील गुन्हे सरकारने मागे घेण्यात यावेत, पदोन्नती अरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यांबाबत मराठा समाजांनी आज संपूर्ण राज्यभर ठिय्या आंदोलन करुन संबंधित तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पेण नगरसेवक राजेंद्र वारकर, अनंता सावंत, सुरेश कदम, विष्णू कदम, भानुसकर, मंगेश दळवी, दिनेश खामकर,सुभाष टेंबे, अविनाश पाटील, नाना महाडिक आदि समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.