Press "Enter" to skip to content

मराठा समाज पुन्हा आक्रमक : घोषणांनी रायगड दणाणले

सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत 🔶🔷🔷🔶

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील मराठा समाजाने विविध स्वरूपाची आंदोलने, मोर्चे काढले. प्रदीर्घ काळ संघर्ष, लढा व अनेकांच्या बलिदानाने समाजाला आरक्षण मिळाले. अशातच मराठा आरक्षणाला मा. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने समाजात पुन्हा असंतोष पसरला.

मराठा आरक्षण स्थगिती उठवावी आणि विविध मागण्यांसाठी आज जिल्ह्यातील मराठा समाज एकवटला होता. जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले.

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमल बजावणी करावी, शासनाने पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणानुसार काय निर्णय घेणार हे जाहीर करावे या मागण्याचे निवेदन मराठा समाजाकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष यांच्याकडे देण्यासाठी रायगड जिल्ह्यात मराठा समाज तहसील कार्यालयासमोर एकवटला होता.

सकाळी 11 ते 1 वाजेपर्यत समाजाने तहसील कार्यालयाबाहेर बसुन ठिय्या आंदोलन केले. यावेळी जय शिवाजी, जय भवानी, एक मराठा लाख मराठा या घोषणानी परिसर निदादाला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.