Press "Enter" to skip to content

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना कर्जत नगरपरिषद तर्फे अभिवादन


सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔶🔷🔷🔶


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना कर्जत नगरपरिषद तर्फे अभिवादन करण्यात आले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म : मथुरा, 25 सप्टेंबर इ.स. 1916 हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका विशाखा जिनगरे,स्वामिनी मांजरे, नगरसेवक राहुल डाळींबकर, विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे आदी सह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.