Press "Enter" to skip to content

छात्रभारतीच्या वतीने रायगडात केंद्रीय कृषी विधेयक बिलचा निषेध

सिटी बेल लाइव्ह / खालापूर 🔷🔶🔷🔶

छात्रभारतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर (HOC) वसाहत खालापूर केंद्रीय कृषी विधेयक बिलचे निषेध करण्यात आले तसेच रायगड मध्ये उरण , माणगांव, मुरुड, रोहा, सुधागड येथे छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला.

सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रामध्ये शेती आणि शेतकरी यांना उध्वस्त करणारे कृषी विधेयक संसदेमध्ये मंजूर करून अन्याय केलेला आहे.यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांची भांडवलदारांकडून मोठ्या प्रमाणात लुट होणार आहे. भांडवलदार व बडे व्यावसायिक यांचा अप्रत्यक्ष मार्गच सरकारने खुला केलेला आहे.

सदर विधेयकाच्या माध्यमातून आम्ही काहीतरी नवीन करत असल्याचा केंद्र सरकारची भूमिका आहे, परंतु निर्बंध काढून टाकल्याने एक प्रकारची मक्तेदारी निर्माण होणार आहे. तसेच यापूर्वीही शेतकरी मार्केट बाहेर आपल्या शेती मालाची विक्री करतच होते. केंद्र सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्वच संपवून टाकत आहे, त्यामुळे नियंत्रण संपणार आहे. कंत्राटी शेती यामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त होणार आहे. सदर तीनही विधेयके केंद्र सरकारने संख्याबळच्या जोरावर रेटून बेकायदेशीरपणे पास करून घेतली आहे.खरंतर हमी भाव व स्वामिनाथन आयोग या गोष्टी महत्वाच्या असताना भांडवलदारांच्या हिताचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

दर विधेयक शेती आणि शेतकरी यांच्या विरोधातील असून सदर विधेयकास आम्ही शेतकऱ्यांची मुलं- मुली छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने विरोध करतो व केंद्र सरकारचा या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करतो , केंद्र सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे अन्यथा छात्रभारती च्या वतीने लोकशाही आणि संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येतील.

पोस्टर आंदोलनात छात्रभारती रायगड अध्यक्ष जितेश किर्दकुडे , कार्यवाह शुभम वाघोस्कर, सहकार्यवाह हर्षल गावडे, सचिव सर्वेश साळुंखे, सहसचिव सागर मगर, युवती संघटीका वैष्णवी गंगावणे, श्रद्धा मिसाळ, सहसंघटक लोमेश रसाळ, तालुका समन्वय रोहन भोईर, राकेश पोटले, सदस्य सौरभ बेडेकर, राहुल मगर, ओमकार मोरे, श्रुती मोरे, अक्षय सावंत, तुषार जंगम, ऋतुजा पाटील, तेजस्विनी साटमकर, साहिल वळंज, समीर म्हात्रे, लखन महाडिक, विठ्ठल कोळी, नीरज गायकवाड, यश ठाकूर यांनी आपआपल्या ठिकाणी निषेध दर्शवला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.