Press "Enter" to skip to content

पनवेलमधील तहसील कार्यालयासमोर मराठा मोर्चाचे धरणे आंदोलन

सिटी बेल लाइव्ह / पनवेल 🔶🔷🔷🔶

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजात तीव्र आक्रोश आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीची घोषणा करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे मराठा समाजात सरकारविरोधात तीव्र असंतोष पसरला असून, पनवेलमधील तहसील कार्यालयासमोर मराठा मोर्चाचे जिल्हा समन्वयाक विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये ज्याप्रमाणे एकाच दिवशी 20 ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले, त्याचप्रमाणे पनवेल मधील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

या वेळी मराठा क्रांती मोर्चा रायगड आणि सकल मराठा समाज रायगड यांच्या वतीने नायब तहसीलदार राहूल सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात गणेश कडू, प्रकाश खैेरे, राजेंद्र भगत, समीर कदम, यतीन देशमुख, महाडीक काका, रामदास शेवाळे यांच्यासह अनेक मराठा बांधव सहभागी झाले होते. या वेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये या करीता मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.