शिक्षकांच्या असहकारानंतर “माझे कुटूंब माझी जबाबदारी” ची जबाबदारी अंगणवाडी ताईंच्या खांद्यावर 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / उरण (बातमीदार) 🔶🔷🔷🔶
माझे कुटूंब माझी जबाबदारी ह्या सर्वेक्षणाला शासनाने गाजावाजा करून सूरुवात केली आहे. परंतू उरण मध्ये या जबाबदारीवर नियुक्त केलेल्या शिक्षकांनी जबाबदारी झटकल्याने तहसील प्रशासनाने आंगणवाडी ताईंवर अतिरीक्त भार टाकत त्यांची या कामी नियुक्ती केली आहे.त्यामूळे स्तनदा माता,गरोदर स्त्रीया,लहान बालके यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तसेच कोविड काळात संपूर्ण देश बंद असताना आंगणवाडी ताई आपले काम सातत्याने करत होत्या.त्यावेळी कोविड साठी आरोग्य सर्वे तसेच अन्य कामे करुन त्यांनी शासनाला मोलाच सहकार्य केल.परंतू आंगणवाडी ताईंचा संबंध लहान बालके, स्तनदा माता,गरोदर स्त्रीया यांच्या सोबत सातत्याने येत आसल्याचे शासनाच्या लक्षात आल्यावर त्यांना या कामातून मुक्त केले.

परंतू पून्हा एकदा उरण तहसील प्रशासनाने पोषण महा चालू असताना,अंगणवाडी ताईंना “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या सर्वेक्षणासाठी त्यांची नियुक्ती केली आसून शासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवली आहे.त्याच बरोबर स्तनदा माता,गरोदर स्त्रीया,लहान बालके यांचे आरोग्य धोक्यात आणले आहे.
शिक्षक संघटनेने पत्र दिले आहे.परंतू त्यांनी शासनाला सहकार्य करायला हवे होते.मि त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर कळविले आहे.त्याच बरोबर शासनाला सातत्याने सहकार्य करणार्या अंगणवाडी सेविका व आशांच कौतुक कराव तेवढ कमिच आहे.
भाऊसाहेब अंधारे - तहसीलदार उरण
शिक्षक संघटनेने हा काम करण्यास नकार दिला आहे.परंतू त्यांनी काम करायला पाहीजे होत.या संदर्भात सिओ साहेब काय निर्णय घेतात त्यानुसार पुढिल कार्यवाही करण्यात येईल.
निलिमा गाडे- गट विकास अधिकारी उरण








Be First to Comment