Press "Enter" to skip to content

परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गांमध्ये चितेंचे वातावरण


भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔷🔶🔷🔶

संपुर्ण रायगड जिल्ह्याला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. दररोज सुरू असलेल्या या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी वर्गांमध्ये चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे.

रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणुन ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेती पिकवली जाते. पंरतु सध्याच्या वातावरणातील बदलामुळे व दररोज पडणा-या अवकाली पावसामुळे पुर्णत: तयार झालेल्या भाताच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी वर्गांमध्ये चिंता पसरली आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात भातकापणीला जोरदार सुरूवात असते. पंरतु यावर्षी सध्या लांबलेल्या या परतीच्या पावसामुळे भातकापणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

नागोठणे परिसरामध्येही भाताचे पिक पुर्णपणे तयार झाले असल्याने अनेक शेतकरी भातकापणीला सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत. पंरतु दररोज सुरु असलेल्या ढगाच्या गडगडाटासह वातावरणात बदल होऊन पडत असलेल्या परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाताच्या तयार झालेल्या लोंबी तसेच भाताची रोपे पुर्णपणे खाली पडुन शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच जर का शेतीची कामे ही वेळेतच पुर्ण केली नाही तर भातशेती साठी खर्च केलेला खर्च तरी भरून निघेल की, नाही अशी शंका बळीराजाला सतावत आहे. अजुन थोडे दिवस पावसाची परिस्थिती अशीच राहीली तर यापुढे शेती करायची की नाही ? असा प्रश्न शेतक-यांपुढे निर्माण झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.