सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत 🔷🔶🔶🔷
रायगड जिल्ह्यातील पेण येथील रायगड बाजार शेजारी असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेला सकाळी 5.00 वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत बाजूचे एक दुकान देखील आगीचे भक्ष्य ठरले.
शॉर्ट सर्किटमुळे सदर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. लागलेल्या भीषण आगीत बँकेचे मोठे नुकसान झाले आहे. बराच वेळ आगीचे लोळ दिसून येत होते. सभोवतालच्या नागरिकांनी बँकेबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाने देखील तातडीने धाव घेतली. व मदतकार्य सुरू केले.

घटनास्थळी JSW कंपनी व पेण नगरपालिका यांच्या फायर ब्रिगेडची वाहने तात्काळ दाखल झाली असून आग विजविण्याचे काम सुरू आहे.








Be First to Comment