Press "Enter" to skip to content

शिवसेना नेते मंञी एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

सिटी बेल लाइव्ह / मुंबई :  🔶🔶🔷🔷

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात आता शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

‘काल मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…’ असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.