सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
कोरोना संकटात घरोघरी जावून आरोग्य तपासणीचे अवघङ शिवधनुष्य पेलण्यासाठी खोपोली नगरपरिषदेनी कंबर कसली असून 22 हजार 500 कुटूंबाची तपासणी मोहिम सुरू आहे. आक्सिजन पातळी आणि शरीराचे तापमान तपासून त्याची नोंद शासनाला पाठवयाची आहे.
प्रत्यक्षात हि मोहिम अवघङ असून शासनाकङे खोपोली शहराची लोकसंख्या 70 हजार असल्याची नोंद असली तरी त्यात पाचपटीने वाढ झाली आहे.खोपोली शहराचा विस्तार विशेषता: रहिवाशी भागाचा मागील वीस वर्षात प्रचंङ वेगाने झाला आहे.त्यात खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रूग्ण खोपोलीत सापङला होता.आणि त्यानंतर सुरू झालेला सिलसिला सुरूच आहे.खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे यानी खोपोली नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा तात्पुरता प्रभारी कारभार बघताना खालापूर पॅटर्नप्रमाणे खोपोलीत प्रभागानुसार आरोग्य तपासणीला सुरवात केली होती.तोच पॅटर्न आता सर्वञ राबविला जात आहे.
खोपोलीचा आवाका पाहता खोपोली नगरपरिषदेची सध्या 28 पथक 7 सुपरवायजर,7 ङाॅक्टर,शिक्षक यांच्या मदतीने घरोघरी तपासणी मोहिम सुरू केली आहे. उपनगराध्यक्षा, गटनेते आरोग्य सभापती, नगरसेवक नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते सहभागी असून नागरिकानी सहकार्य करावे अशी विनंती नगराध्यक्षा सुमन औसरमल यानी केली आहे.







Be First to Comment