सिटी बेल लाइव्ह / गोवे कोलाड ( विश्वास निकम)🔷🔷🔶🔶
निसर्ग वादळाने कोकणासह संपूर्ण रायगडसह रोहा तालुक्यात सामान्यांच्या घरांची मोठी पडझड झाली. अनेक ठिकाणची घरे, झोपड्या जमीनदोस्त झाल्या, काहीच्या घरांचे छप्पर उडाल्याने संसार रस्त्यावर आले. कपडे, धान्य,व घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
नुकसानग्रस्ताना भरपाई म्हणत शासनाने करोडोंचा निधी जाहीर केला तो स्थानिक प्रसासनाकडे देखील आला मात्र काहींना भरपाई मिळाली तर काही जण अक्षरशः अद्याप प्रतीक्षेत आहेत. ऐन पावसातच अनेक कुटूंब रस्त्यावर आले. त्यावर तातडीने पंचनामे म्हणत अधिकाऱ्यांनी मोठा घोळ घातला. काही तलाठी, ग्रामसेवकांनी जागेवर न जाता कार्यालयात बसून पंचनामे केले.
काही सरपंच, गाव पुढारी यांना विचारून पंचनामे गाव पातळीवरच तयार केले तर जागेवर जाऊन पंचनामे केले त्याच पचनाम्यांचा घोळ अद्याप सुटे ना पंचनामे गेले कुठे बँकेत पैसे जमा होणार या प्रतीक्षेत आज देखील खरे नुकसान बाधित आहेत अधिकाऱ्यांचा खुपच पराक्रम आहे काहींच्या पंचनाम्याची यादीवर नावे असून देखील भरपाई मिळाली नसल्याचे समोर येत आहे. ज्यांचे काहीच नुकसान झाले नाही अशांनाही भरपाई मिळाली. तर जे अक्षरशः उध्वस्त झाले अशा सामान्य शेतकरी मजूर यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही.
प्रामुख्याने ग्रामीण भागातील बाहे देवकान्हे खांब वरसगाव कोलाड आंबेवाडी सह काही गावातील बधितांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही तर बँकेत शून्य रक्कम त्यामुळे चक्रीवादळ नुकसानभरपाईची ओरड अद्याप रोहा तालुक्यात कायम आहे . मार्च महिन्यापासून कोरोनाने आधीच सामान्यजण कोलमडला. त्यात 3 जून च्या चक्रीवादळाने अधिक बेचिराख केला काही क्षणातच होत्याचे न्हवते केले. त्यातील उध्वस्त अनेक शेतकरी कुटुंबांना भरपाई नाही.
काहींना १ हजार, ३ हजार मदत देउन अधिकाऱ्यांनी चेष्ठा केली. कोलाड,वरसगाव खांब देवकान्हे बाहे येथील सामान्य कुटुंबाना मदतच मिळाली नाही. तर बाहे ग्रामस्थांची तर अक्षरशः दोनवेळा घरांची नुकसानी झाली यात २९ एप्रिल रोजी अचानक आलेले चक्रीवादलात बाहे ग्रामस्थांच्या घरांवरील छप्पर उडून गेले त्याचे देखील तातकाल पंचनामे तयार केले मात्र अद्याप भरपाई नाही तर अद्याप प्रतीक्षा
तर ३ जून रोजी नुकसान झालेल्या येथील चार ते पाच घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली पैकी ४ हजार रुपये भरपाई दिली. तर काहींना १५ हजार रुपये नुकसानभरपाई व १० हजार धान्यसाठा भिजल्याची मदत असे एकूण २५०००रु दिले गेले तर उर्वरित अद्याप खात्यात आलीच नाही गावातील पुढारी, काही गावांत नुकसान १० टक्के भरपाई ९० टक्के कुटुंबाना देण्यात आली, खरे लाभार्थी अजून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. अशात हेच का निकष ? असा सवाल उपस्थित होत आहे.
खांब येथील अविनाश म्हात्रे, सदानंद विष्णू वेदक,नारायण विष्णू श्रीमती प्रभावती दत्तात्रेय विरकर गाडी बाहे येथील मोरेश्वर भिकू बामुगडे, श्रीमती स्मिता महादेव गोविलकर विलास महादेव थिटे गणेश थिटे, शंकर देवकर सह आठ ते दहा कुटूंब अद्याप भरपाईची प्रतीक्षेत कोलाड येथील सदानंद साळुंखे, दगडू रामचंद्र हाटकर सह कोलाड वरसगाव येथील काही बाधित अपेक्षित आहेत.
चक्रीवादळात नुकसान झालेल्या उर्वरित बाधित कुटूंबियांना फेर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी :- सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सानप यांची मागणी,
नैसर्गिक आपत्ती अनेक सामान्यांसाठी मरणाहून अधिक यातना ठरते. अगदी कोरोनाच्या काळातच ३ जुनला निसर्ग चक्रीवादळ आले, त्या वादळाने पेण, श्रीवर्धन, म्हसळा यांसह रोहा तालुक्यातील सामान्यांच्या घरांचे मोठे नुकसान केले. काही गावात तब्बल ७० टाक्यांहुन अधिक नुकसान झाले. त्यासर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे म्हणत मोठा संशयाचा घोळ केला. अनेक गावांतील पंचनाम्याची प्रक्रिया खुद्द काही सरपंच, गाव पुढाऱ्यांनी हातात घेतली. तलाठी, ग्रामसेवकांनी मागेपुढे न पाहता नुकसानीचे पंचनामे मंजूर केले.







Be First to Comment