सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
महाविद्यालयात परिक्षा असल्याने खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंङळाच्या विनंतीने आणि जिल्हाधिकारी यांचे आदेशाने कोव्हीङ केंद्र तात्पुरते बंद करण्यात आल्याचा खुलासा खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल यानी केला आहे.
खालापूर तहसीलदारांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी बैठक घेतली होती. त्या दरम्यान काहिनी खोपोली कोव्हीङ केंद्र बंद असल्याची तक्रार केली होती.परंतु त्यात तथ्य नसल्याचे तसेच कोणाचे गैरसमज होवू नये यासाठी नगराध्यक्षानी खुलासा केला. वाढते कोरोना रूग्णामुळे खोपोली नगर परिषद केएमसी महाविद्यालयात 40 बेडचे केंद्र सुरू केले होते.तसेच शिळफाटा येथील बाह्यरूग्ण केंद्रात देखील 20 बेङची सोय केली होती.
मध्यंतरी रूग्ण संख्या घटल्याने फक्त केएमसी महाविद्यालयातील केंद्र फक्त सुरू होते.सध्या परिक्षा असल्याने मंङळाच्या विनंतीने व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेशप्रमाणे केंद्र तात्पुरते बंद ठेवण्यात आले असून आणि शिळफाटा येथील सुरू ठेवण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा औसरमल यानी दिली.डॉक्टर आणि इतर स्टाफ उपलब्ध असल्याचे सांगितले.
खोपोलीत दररोज भेटणारे कोरोना रूग्णसंख्या पाहता खाजगी कोव्हीङ देखील सुरू आहे.परिक्षा झाल्या कि केएमसी कोव्हीङ केंद्र पूर्ववत सुरू होईल.
सुमन औसरमल - नगराध्यक्षा खोपोली नगरपरिषद







Be First to Comment