सिटी बेल लाइव्ह / पनवेल 🔷🔶🔷🔶
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम शासनाने हाती घेतली आहे. त्यापार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा गुरुवारी शुभारंभ झाला.
कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेस पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र 19 मधील ग्रामीण रुग्णालय, कोळीवाडा व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र -1, घाटे आळी येथून शुभारंभ झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी सेवीका व आशा सेवीकांना एसपीओ 2 मशीन देण्यात आल्या.
पनवेल महापालिकेने या मोहिमेसाठी टीम नेमलेल्या असून सेवाभावी संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने स्वयंसेवक नेमले आहेत. या टीम घरोघरी जाऊन लोकांचा सर्व्हे करणार आहेत. त्यामध्ये नागरिकांची तपासणी करून ज्या नागरिकांना काही कोरोनाची लक्षणे आहेत त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
या अभियाना अंतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोना बाधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होईल. या महिमेच्या शुभारंभावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, हिरु भगत, यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व आशा सेवक उपस्थित होत्या.
या संदर्भात सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या मोहिमे संदर्भात अधिक महिती दिली.







Be First to Comment