सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे)🔶🔷🔷🔶
मागच्या आठ दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे पेण तालुक्यातील भात शेतीसह वेलवर्गीय भाजीपाल्यांचे फार मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले आहेत.या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे.पेण तालुक्यातील शेतकरी भात शेती बरोबर आंतरपीक म्हणून शेतकरी वेलवर्गीय भाजीपाला यांचीही लागवड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर करत असतात परंतु या मुसळधार पावसाने भातशेती सह वेलवर्गीय भाजीपाल्याला झोडपून काढले आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
पावसाचे पाणी पिकात शिरल्याने उभे पीक आडवे झाले आहेत. मात्र काही भात पिके फुलोऱ्यावर आली असल्याने तर काही भागात लोबी मध्ये दाना भरण्याची प्रक्रिया सुरू आहे जर पावसाने अशीच हजेरी लावली तर आडवी झालेले भातपीके कुजण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दरवर्षी न पडणारे रोहिणी नक्षत्र यावर्षी मात्र मोठ्या पडत असल्याने शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले आहेत.







Be First to Comment