Press "Enter" to skip to content

आज उरणमध्ये 16 पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह 16 जण सापडले आहेत. 17 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज कोणीही मयत नाही.

आज एकूण पॉझिटीव्ह 1790, उपचार करून बरे झालेले 1522, उपचार घेणारे 181, मयत 87 असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. आज चिर्ले, जासई रेल्वे कॉलनी 1, जेएनपीटी 6, बोकडविरा 1, नवीन शेवा 3, नेव्हल स्टेशन करंजा 1, श्री राम समर्थ कोटनाका 1, द्रोणागिरी कॉलनी म्हातवली 1, सोनारी 1, वशेणी 1 असे एकूण 16 पॉझिटीव्ह आढळले आहेत.
द्रोणागिरी कविकमल 1, नागांव 1, मोरा कोळीवाडा 1, आवरे 1, ओएनजीसी उरण 1, साईनगर बोरी 1, फुंडे 1, भेंडखळ 1, नवीन शेवा 1, करंजा 1, उरण कोळीवाडा 1, गणेश कृपा उरण 1, नवघर 3, नवीन शेवा 1, साईनिकेतन 1 असे एकूण 17 जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले. आज कोणीही मयत नाही.

आज उरणमध्ये कोरोनाने कोणी मयत नसले तरी पॉझिटीव्हचा आकडा वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर उपचार करून घरी सोडण्यात येणारा आकडा ही वाढत आहे. तर उरणकरांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.