सिटी बेल लाइव्ह / प्रतिनिधी / गव्हाण : 🔷🔶🔶🔷
गव्हाण ग्रामपंचायतीचा क्षेत्रफळानुसार खुप मोठा पसारा आहे, तरी सुद्धा सर्वांत जास्त विकासाची कामे करणारी गव्हाण ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायती तर्फे हट्रटीत बगीचे, हायमास्ट लाईट, समाजमंदीर, व्यायामशाळा, पाण्याची सुविधा, गटारे, पेबर ब्लॉक अशा विविध सुविधा नागरिकांना पुरविल्या जात आहेत.
गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपुर्ण गांव व बंदर येथे CCTV कॅमेरे बसविण्याची ग्रामपंचायतीची इच्छा होती. आज ३४ लाख रूपयांच्या CCTV कॅमेरे बसविण्याच्या कामाचा शुभारंभ कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. गव्हाण ग्रामपंचायतीचे अनुकरण इतर ग्रामपंचायत करावा व आपल्या गावाचा विकास करावा असे गोरवोद्गार महेंद्र घरत यांनी या कामाच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत, माजी सरपंच वसंत म्हात्रे, सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, ग्रामपंचायत सदस्य उषा देशुमख, विजय घरत, हेमंत पाटील, कमिनी कोळी तसेच शेखर देशुमख, प्रकाश देशुमख, नंदकुमार कोळी, काशिनाथ कोळी, सि.एच.घरत, अमर गायकवाड, अलताब शेख इत्यादी मान्यवर व गव्हाचे ग्रामस्थ उपस्थित होते.







Be First to Comment