Press "Enter" to skip to content

निवृत्ती वेतन धारकांसाठी महत्वाची बातमी

निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत 🔶🔶🔷🔷

महाराष्ट्र कोषागार नियम व शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी दि.01 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला दि.01 ते दि.30 नोव्हेंबर या कालावधीत कोषागार कार्यालय सादर करावा लागतो.

सद्य:स्थितीत कोविड-19 विचारात घेता राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

तरी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करण्याबाबत झालेल्या या बदलाची नोंद घ्यावी व त्याप्रमाणे दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत हयातीचा दाखला कोषागारात सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. फिरोज मुल्ला यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.