Press "Enter" to skip to content

उद्या चिरनेर जंगल सत्याग्रह दिन साधेपणाने साजरा होणार


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔶🔷🔷

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतीदिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

१९३० साली चिरनेरचा गौरवशाली जंगल सत्याग्रह लढा गाजला होता. त्यानंतर या लढ्यात हौतात्म्य झालेल्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २५ सप्टेंबर हा हिवस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला असतो, मात्र यावेळी कोरोना महामारीच्या संकटामुळे या वर्षीचा म्हणजे आज साजरा होणारा ९० वा स्मृतिदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती चिरनेर ग्रामपंचायतीने दिली.

कोणतीही निमंत्रण पत्रिका न काढता शुक्रवार दि. २५ सप्टेंबर या स्मृतिदिनी मोजकेच मान्यवर उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत. हुतात्मा स्तंभाला अभिवादन करण्यात येणार आहे.

पोलिस दलाकडून बंदुकीतून तीन फैरी झाडत हुतात्म्यांना शासकीय मानवंदना दिली जाणार आहे. तसेच हुतात्म्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.