Press "Enter" to skip to content

खांब नाक्यावर सेवा मेडिकलचे उद्घाटन


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔷🔶🔶🔷


रोहे तालुक्यातील खांब नाक्यावर सेवा मेडिकलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

खांब नाक्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर गावे, वाड्या,वस्त्या यांची संख्या जास्त असल्याने वैद्यकीय सुविधांच्या द्रुष्टीने उद्घाटन करण्यात आलेल्या या मेडिकलचे या ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या मेडिकलचे उद्घाटनही अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते केशव खामकर,अविष्कार मरवडे, बाळा लाडगे,दिलिप घायले,संजय सानप,गोडबोले,वरखले,भगवान अंबाजी तुपकर,वैभव भगवान तुपकर प्रल्हाद शिंपी,नथुराम थिटे आदी उपस्थित होते.तर वैभव तुपकर यांनी येथे सुरू केलेल्या सेवा मेडिकलचे विभागातील सर्वच स्तरातून स्वागत होताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.