सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔶🔷🔷🔶
लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग यांचे सहकार्याने व नागोठणे लायन्स क्लबच्या वतीने येथील लायन्स हेल्थ सेंटर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी व अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा नागोठणे शहर व पंचक्ररोशीतील सुमारे ४५ नागरिकांनी लाभ घेतला.
नागोठणे व पंचक्रोशी मधे लायन्स क्लब नागोठणे सातत्याने विवीध आरोग्य शिबीरे, शैक्षणिक मार्गदर्शन शिबीरे, महिलांसाठी – जेष्ठ नागरिकांसाठी जागरूकता शिबिर, संकट प्रसंगी मदतीचा हात अशी अनेक सामाजिक बांधीलकी जपणारे कार्यक्रम राबवित असते. नागोठणे लायन्स क्लबने नागोठणे विभागातील नागरिकांसाठी डोळ्यांचे आजार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांचे शिबीर यशस्वीपणे संपन्न केले. यामधे सहभागी झालेल्याव ४५ नागरिकांतून यामधे मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे ४ रुग्ण, रेटिना शस्त्रक्रियेचे २ रुग्ण व इतर शस्त्रक्रियेचे ४ रुग्ण रुग्ण या मोफत तपासणी शिबिरात आढळून आले.
मोफत डोळे तपासणी ही सुविधा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी दुपारी ३ ते ५ या वेळेमधे रहाणार आहे. यासाठी ग्रामपंचाय नागोठणे व राजिपचे सदस्य किशोर जैन तसेच सरपंच डॉ. मिलींद धात्रक यांचे सहकार्याने सातत्याने कार्यक्रम घेण्यासाठी एक मध्यवर्ती अशी लायन्स हेल्थ सेंटरची जागा उपलब्ध करुन दिली त्यामुळेच हे शक्य झाल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आय चेकअप चेअरमन लायन प्रकाश जैन तसेच अॅक्टीव्हीटी चेअरमन लायन यशवंत चित्रे यांनी खुप मेहनत घेतली.
यावेळी अध्यक्ष लायन संदिप नायर, सचिव एमजेएफ लायन विवेक सुभेकर, खजिनदार लायन संतोष शहासने सोबत लायन्स हेल्थ फाऊंडेशन आलिबागची डॉक्टर्स टिम यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम चांगल्याप्रकारे यशस्वी झाला.







Be First to Comment