१३ वर्षीय वरदने आपल्या कुंचल्यांतून वाहिली चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना आदरांजली 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून ) 🔶🔶🔷🔷
सुमारे ९० वर्षांपूर्वी जंगल का कानून तोड दिया म्हणत चिरनेरच्या अक्कादेवी माळरानावर ब्रिटीशी पोलिसांशी पंगा घेत आपले हक्का मागणाऱ्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना येथील पिरकोन गावातील लहानगा वरद खुशाली विलास गावंड याने आपल्या कुंचल्यातून अनोखी आदरांजली वाहिली आहे .
या लहानग्या चित्रकाराने आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना मानवंदना. दिली आहे. उद्या २५ सप्टेंबर रोजी त्या क्रान्तिकारी चिरनेर जंगल सत्याग्रहाला ९० वर्षे पुर्ण होत आहेत. वरद खुशाली विलास गावंड या विद्यार्थ्यांने कोरोना काळातील सक्तीच्या विश्रांती पासून ते 3 सप्टेंबर 2020 या त्याच्या 13 व्या वाढदिवसा पर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची 50 चित्रे पुर्ण करून भारतमातेसाठी ज्यांनी लढा देऊन आपणांस स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या थोर क्रांतिकारकांचे स्मरण घडवून आणले, विशेषतः पुढच्या पिढीला हा इतिहास फक्त पुस्तकातील रकाने न राहता देशाच्या निर्मितीचा आदर्श व्हावे, असा संदेश जणू त्याच्या चित्रकलेच्या छंदातून मिळत आहे.
त्याच्या या अनोख्या छंदाचे उरणच्या पुर्व भागात कुतूहल निर्माण झाले आहे .
पूर्वीचा कुलाबा आणि आजच्या रायगड जिल्ह्यातील चिरनेर या गावाजवळील अक्कादेवीच्या जंगलात 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह झाला. त्यावेळी पोलिसांनी जो स्वैर गोळीबार केला होता, त्यामुळे जंगल सत्याग्रहाकरीता जमलेल्या सत्याग्रहीं पैकी आठ सत्याग्रहींना आपला प्राण गमवावा लागला. त्या स्मृतींना आज 90 वर्षे पूर्ण होत आहेत. चिरनेर येथील हुतात्मा स्तंभाजवल 25 सप्टेंबर रोजी जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.
वरद खुशाली विलास या पिरकोन गावातील विद्यार्थ्याने हुतात्मा आलू बेमट्या म्हात्रे – दिघोडे, हुतात्मा आनंदा माया पाटील – धाकटी जुई, हुतात्मा धाकू गवत्या फोफेरकर – चिरनेर,हुतात्मा नाग्या महादू कातकरी – चिरनेर, हुतात्मा रघुनाथ मोरेश्वर न्हावी – कोप्रोली, हुतात्मा रामा बामा कोळी – मोठी जुई, हुतात्मा हसुराम बुध्या पाटील – खोपटे, हुतात्मा परशुराम रामा पाटील – पाणदिवे, या आठ हुतात्म्यांची चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न करून आपल्या विद्यार्थीदशेत कलेच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. यापूर्वीही वरद याने आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून वेगळच काही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे .
कोणतेही चित्रकलेचे विशेष शिक्षण वैगरे ना घेता केवळ बघून आणि आत्मसात करून वार्ड याने आपली चित्रकला जोपासली असून त्याने या माध्यमातून हुतात्म्यांना मानवंदना दिली आहे







Be First to Comment