हेमाली म्हात्रे यांचा रायगड जिल्ह्यात दुसरा क्रमांक 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / प्रतिनिधी ( कोप्रोली) 🔶🔶🔷🔷
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून कोरोना सारख्या महामारीत संपूर्ण महाराष्ट्रात निबंध स्पर्धेचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये 1120 निबंध सोशल मीडियाच्या माध्यमातून परिषदेकडे पोहचले. नामांकित शिक्षण तंज्ञाकडून 12 नावे निवडण्यात आली.. यामध्ये आपल्या रायगड जिल्यातील सौ. हेमाली बगाराम म्हात्रे (कोप्रोली-Uran) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.
‘एक दिवा ज्ञानाचा’ या विषयावर 1200 शब्द मर्यादा असलेला निबंध तिने सादर केला होता. विजेत्या स्पर्धकांना लवकरच मा.छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते रोख रकमेचं पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल मा.नामदार श्री छगनरावजी भूजबळ साहेब व कार्याध्यक्ष बापूसाहेब भूजबळ यांच्या हस्ते आज जाहिर करण्यात आला.
यावेळी समता परिषदेचे संघटक सचिव रवी सोनवणे, प्रदेश प्रचारक डॉ.नागेश गवळी, नाशिक कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, हर्षल खैरनार उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना लवकरच मा भुजबळ साहेब यांचे उपस्थितीत बक्षिस वितरण केले जाईल…

विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन..
सुयश प्राप्त हेमाली म्हात्रे हिचे सर्वस्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक श्री राजू मुंबईकर सर यांनी विशेष सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर , श्री संपेश पाटील सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष निवास गावंड यांनी विशेष गोड कौतुक केलं आहे.
.







Be First to Comment