Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज १९ पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १९ जण सापडले आहेत. २८ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज कोणीही मयत नाही.

आज एकूण पॉझिटीव्ह १७७४, उपचार करून बरे झालेले १५०५, उपचार घेणारे १८२, मयत ८७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज सारडे १, उरण कोळीवाडा १, वशेणी १, म्हात्रे वाडी १, कोमल नेव्हल स्टेशन २, अनुपमा नेव्हल स्टेशन २, डीएससी नेवल स्टेशन २, ,कोमल बी नवेनगर करंजा १, नेवल अपार्टमेंट एनएडी करंजा १, कोप्रोली १, जांभुळपाडा १, ओएनजीसी १, कुंभारवाडा १, विंधणे १, द्रोणागिरी कॉलनी १, जेएनपीटी १ असे एकूण १९ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. करंजा १, सीआयएसएफ १, नागाव १, कोटनाका १, बोरी पाखाडी १, धाकटी जुई १, कस्टम भोवरा ४, बोरी मोरा रोड १, वैभव लक्ष्मी सोसायटी १, आंनदनगर १, कोंढरीपाडा करंजा १, सारडे २, बालाजी रोड १, हनुमान कोळीवाडा १, माधवी कॉंप्लेक्स १, पाणजे १, नेवल करंजा १, उरण बाजारपेठ १, कोटनाका १, जसखार १, पाले १, फुंडे १, कोप्रोली १, जेएनपीटी १ असे एकूण २८ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.
आज उरणमध्ये कोरोनाने कोणी मयत नसले तरी पॉझिटीव्हचा आकडा वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर उपचार करून घरी सोडण्यात येणारा आकडा ही वाढत आहे. तर उरणकरांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.