Press "Enter" to skip to content

जि प शिक्षकांना “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेत सहभागी करू नये

प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत मोकल यांची मागणी  🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / विकास पाटील 🔷🔶🔶🔷

कोविड १९ साथीच्या आजाराचे  सर्वेक्षण ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” ही मोहिम आरोग्य विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिलेले स्वयंसेवक यानी राबवावी असा आदेश असताना जि प शाळेतील शिक्षकाना यात सहभागी करण्यात येत आहेत तेव्हा त्यांना या मोहिमेत सहभागी करू नयेत त्यांना कार्यमुक्त करण्यात यावेत अशी विनंती पनवेल तहसिलदार  यांच्याकडे पनवेल  प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष वसंत मोकल यांनी  लेखी निवेदनाने केली आहे. 

संपूर्ण जगभरात थैमान घातले असून देश व राज्यात देखील कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे वाढती रुग्णसंख्या व मृत्यूमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक असून हे रोखण्यासाठी राज्यसरकाने कोविड-19 नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधीच्या मार्फत राबविण्यासाठी  राज्यभर “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. 

या मोहिमेंतर्गत शहर,गाव,पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण दिले जात आहे. या मोहिमेची पहिली फेरी दि.15 सप्टेंबर 10 ऑक्टोबर 2020 आणि दुसरी फेरी 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 अशा टप्प्यात होत आहे.

 कोविड -१९ आजार संबंधीच्या कामकाजासाठी प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करू नये , तर त्यांना कार्यमुक्त करावे असे वरील संदर्भिय पत्रान्वये शासनाचे आदेश आहेत . असा आदेश असताना पनवेल तालुक्यात सर्वेक्षणाकरिता जि . प . शाळांतील शिक्षकांना सहभागी करण्यात आले आहे . या अगोदर जि . प . प्राथमिक शिक्षकांनी कोविड -१ ९ संबंधित चेक पोस्ट डयुटी , रेशन दुकानांवर ड्युटी , नोडल अधिकारी , गावस्तरीय कोविड नियंत्रण कक्षा , कुंटुंब सर्वेक्षण इ . ठिकाणी कर्तव्य बजावले आहे . यापुढे कोविड -१ ९ नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून आवश्यक आहे  असे शासनाचे आदेश आहेत  शासनाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षकांना कोविड -१९ , संबंधी कोणत्याही सर्वेक्षणासाठी नेमण्यात येऊ नये गले असतील तर कार्यगुक्त करण्याविषयी आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावेत अशी विनंती शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत मोकल यांनी पनवेल तहसिलदार यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.