सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव : पाताळगंगा 🔶🔶🔷🔷
सर्वत्र ठिकाणी शेतीची कामे पूर्ण झाल्यामुळे आदिवासी बांधवांच्या हाताला कोठेच काम मिळेनासे होत,असल्यामुळे पावसाळ्यात निर्माण झालेले गवत आदिवासी यांना रोजगार मिळून देत आहे.ग्रामीण भागात शेतजमीन शिवाय बराचसा भाग ओसाड असतो. याच ओसाड जमिनीवर उगवणारे गवत कापून ते विक्री करीत असल्याचे चित्र सध्या तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
कोरोना च्या पाश्वर्भूमी मुळे आपल्याला रोजगार कसा मिळणार? आपला उदरनिर्वाह कसा करायचा? ही चिंता सातत्याने भेडसावत असते.मात्र दर वर्षी पावसाळ्यामुळे तयार होणा-या गवतामुळे आदिवासी यांना रोजगाराचा प्रश्न सुटत असतो.सध्या गवताला मोठी मागणी असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला निर्माण झालेले गवत आदिवासी कापून त्याची विक्री करीत आहे.शहरातील मोठे तबेलेवाले व इतर व्यक्ती मोठय़ा प्रमाणात गवताची खरेदी करत असून यातून त्यांचा उदरनिर्वाह होत आहे.
आदिवासी समाज हा दुर्गम अशा डोंगराळ भागामध्ये राहत असतो.मात्र पावसाळ्यात या माळरान अथवा डोंगराळ भागात मोठ्याप्रमाणावर गवत निर्माण होत असते.त्याच बरोबर ज्या शेतामध्ये लागवड केली नाही त्या ठिकाणी सुद्धा गवत निर्माण होत असते.यांची विक्री करून घरचे भागवणे सोपे जात आहे.असे मत आदिवासी बांधव यांनी व्यक्त केले.







Be First to Comment