Press "Enter" to skip to content

महामार्गावरील खड्डयांमुळे वाहनांचे होतेय मोठे नुकसान


मेकॅनिकल व टायरवाले यांना आलेत सुगीचे दिवस 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔷🔶🔶🔷

दरवर्षीची अविरत अशी खड्डयांची परपंरा सुरु असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर यावर्षीही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पेण ते कोलाड या दरम्यान अक्षरश: महामार्गावर खड्डयांची चाळण झालेली दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरुन वाहन चालवणे मोठी डोकेदुखी ठरत आहे.

या भयानक खड्डयांमधुन वाट काढता काढता जीव मेटाकुटीला येत आहे. त्यातच खड्डयांतुन वाहन चालवत असतांना वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळेच मेकॅनिकल व टायरवाले यांना आलेत सुगीचे दिवस आले आहेत.

खड्डेमय महामार्गावर सद्यपरिस्थिती जे खड्डे पडलेले आहेत त्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने नुसतीच वरचेवर खडी टाकुन खड्डे भरले जात आहेत. पंरतु ही खडी टाकुन जे खड्डे भरले जातात ती खडी एक-दोन तासातच खड्डयांमधुन बाजुला ऊडुन गेल्यामुळे पुन्हा खड्डयांची अवस्था जैसे थे होत आहे.

त्यामुळे याच खड्डयांमुळे वाहने खड्डयांत आदळुन वारंवार वाहनांचे टायर पंक्चर होणे, गाड्यांचे वेगवेगळे पार्ट तुटणे असे प्रकार घडत आहेत. त्यातच दुचाकीला अपघात होऊनही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वाहने दुरुस्त करणारे मेकँनिकल व टायरवाले यांना सुगीचे दिवस आले आहेत. पंरतु वाहनचालकांच्या खिशाला मात्र चांगलीच कातर बसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.