दोन दिवसात आढळले पाच नवीन रुग्ण 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔶🔶🔷🔷
रायगड जिल्ह्यातील कोरोनीची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रोहा तालुक्यात सुद्धा दिवसेगणिक कोरोनाची संख्या ही वाढत असुन नागोठण्याजवळील वांगणी ग्रामपंचात हद्दीमध्ये कोरोना संख्या वाढत आहे. वांगणी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या दोन दिवसात कोरोनाचे नव्याने पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे विभागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सद्यपरिस्थितीत वातावरणातही मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. कधी उन्ह तर कधी पाऊस. अशा वातावरणामुळे सध्या ब-याच लोकांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसुन येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात आपल्याला कोरोना झालाय की काय अशी भिती निर्माण झाली आहे. त्यातच नागोठणेजवळील वांगणी ग्रामपंचायत हद्दीतिल आमडोशी गावात मागील दोन दिवसात पाच नविन कोरोनाचे रुग्ण आढळुन आले आहेत. त्यामुळे आमडोशी गावासह बाजुच्या परिसरामधिल नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या पंचायतीमधिल गावांमध्ये अद्यापपर्यंत एकुण १० ते १२ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान याबाबतीत नागरिकांनी घाबरुन न जाता दररोज मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, एकमेकांशी बोलतांना अंतर ठेवणे, गरम पाणी पिणे, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी विटामिन्सच्या गोळ्या खाणे, तसेच कोणालाही ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्यास नागोठणे प्राथमिक आरोग्य केद्रांत जाऊन तपासणी करुन घेणे असे आवाहन नागोठणे प्राथमिक केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.चेतन म्हात्रे यांनी केले आहे.
Be First to Comment