सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
घरोघरी आरोग्य तपासणी मोहिमे दरम्यान ग्रामपंचायतीला चांगल्या दर्जाचे ऑक्सिमीटर पुरवा अशी मागणी माजी महिला व बालकल्याण सभापती ,विद्यमान जिल्हा परिषद सदस्या उमा मुंङे यानी तहसीलमध्ये आयोजित बैठकित केली.
शासनाने पंधरा सप्टेंबरपासून माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटूंबाची तपासणी सुरू केली आहे.खालापूरात 44ग्रामपंचायती ,एक नगरपंचायत आणि खोपोली नगरपरिषद हद्दीत मोहिमेला सुरवात झाली आहे.ऑक्सिमीटर बाबत अनेक तक्रारी येत असून बनावट ऑक्सिमीटरचा सुळसुळाट सुरू आहे.त्यामुळे चांगल्या दर्जाचे ऑक्सिमीटर ग्रामपंचायतीना द्यावे जेणेकरून चाचणीत दोष राहणार नाहि अशी भूमिका उमा मुंङे यानी मांङली.तसेच पंचायत समितीने याबाबतीत सहकार्य करण्याची मागणी वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकङे करण्यात आली .






Be First to Comment