Press "Enter" to skip to content

पोषन जनजागृती मोहीमेत दिशा केंद्राचा सहभाग

कूपोषण, सूपोषण, बालसंरक्षणासह आरोग्य शिक्षणा बाबत केले जात आहे जागृत 🔷🔶🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔷🔶🔶🔷

केद्र सरकारकार व राज्यसरकारच्या वेगवेगळ्या विभागाच्यावतीने स्थानिक स्वयंसेवी संस्थाच्या सहभागाने देशभरात राबवण्यात येत असलेल्या 1 ते 30 सप्टेंबर मधील पोषण महिणा अभियानात रायगड मध्ये दिशा केद्र ही स्वयंसेवी संस्था सहभागी होत गाव पातळीवर विशेषतः आदिवासी वाडी वस्त्यांवर जात कूपोषण, सूपोषण, बालसंगोपन, बालसंरक्षणासह आरोग्य शिक्षण देत जनजागृती केली जात आहे.

केद्र सरकारच्या महिला बालविकास विभागाचे वतीने राबविण्यात येणाऱ्या चाईल्ड लाईन 1098 या या प्रकल्पाची जिल्हा समन्वय संस्था दिशा केद्र असुन या प्रकल्पाच्या वतीने अलिबाग तालूक्यातील व कर्जत तालूक्यातील आदिवासी वाड्यावर जाउन जागृती केली जात आहे. कूपोषन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे वतीने कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रिशन - कँन ही प्रक्रिया कर्जत तालूक्यातील 40 आदिवासी अगंणवाड्या मध्ये दिशाच्या समन्वयाने राबवली जाते, तर केन्द्रीय समाज कल्याण बोर्डाच्या मान्यतेने अडचणीत असलेल्या महिलांना मदतीसाठी सोबतीण कुटुंब सल्ला सहाय्य केद्र चालवले जाते.

या सर्व कार्यक्रमात सहभागी कार्यकर्ते आदिवासी वाड्यावर जात बाळाच्या जन्मा पासुन हजार दिवसात घ्यावयाची काळजी, स्तनपान,गरोदरपणातील काळजी व पोषण, नवजात शिशुची घ्यावयाची काळजी, तसेच कोविड सारख्या महामारीच्या कालखंडात आरोग्याची कशी काळजी घ्यावी या बाबतीत पोष्टर प्रदर्शन, गीत गात ,गाव बैठका मधुन जनजागृती करत आहेत.

30 सप्टेंबर पर्यत नियमीतपणे या मोहीमेच्या माध्यमातून लोकशिक्षण केले जाणार आहे अशी माहिती दिशा केंद्राचे कार्यक्रम समन्वयक अशोक जंगले यानी दिली.या जनजागृती मोहिमे मध्ये चाईल्ड लाईनच्या समंन्वयक वैष्णवी दभडे, रेखा भालेराव, अमोल जाधव, कवीता सूर्यवंशी,वैजंती श्रीखंडे, आकेश ब्रीजे,स्वप्नाली थळे, कँन प्रकल्पाच्या विमल देशमुख, रवी भोई, कुटुंब सल्ला सहाय्य केद्राच्या समुपदेशिका माधूरी कराळे, नेहा कडव,आरोग्य सेवावर देखरेख प्रकल्पाचे उज्जैन सिरसाठे, अनिता जाधव, रूषाली देशमुखआदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

25 सप्टेंबर ला रानभाज्या व खाद्य पदार्थ प्रदर्शन व मार्गदर्शन शिबीर

या पोषन माह निमीत्ताने दि. 25 सप्टेंबर रोजी तालुक्यातील भालीवडी येथील शासकीय कन्या आश्रम शाळे मध्ये रानभाज्या व खाद्यपदार्थ प्रदर्शन व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले असून रायगड जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य ,शिक्षण व क्रिडा सभापती सूधाकर घारे हे या शिबीराचे उद्घाटन करणार असुन उपविभागीय महसूल आधिकारी वैशाली परदेशी,आदिवासी विकास च्या प्रकल्प आधिकारी शशीकला आहिरराव, उपमुख्यकार्यकारी आधिकारी नितीन मंडलीक, तहसीलदार विक्रम देशमूख आदि मान्यवर पाहूणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. पोषण हक्क गटाचे श्रिपाद कोडे व विनोद शेडे हे रानभाज्या चे महत्त्व आणी कूपोषीत मुलांच्या वाढीतील घसरण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.