Press "Enter" to skip to content

पनवेल तालुका व शहर भाजप महिला मोर्चाच्याची मागणी  

कोविड सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षितेबाबत योग्य ती काळजी घ्यावी  

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (प्रतिनिधी) 🔶🔷🔶🔷

कोविड सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षितेबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी, अशी मागणी पनवेल तालुका व शहर भाजप महिला मोर्चाच्यावतीने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पनवेल पोलीस उपायुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.            

या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन देताना महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहराध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, शहर मंडल वैद्यकीय सेलच्या संयोजिका  ज्योती देशमाने, आदिती मराठे, मनीषा चिले, अंजली इनामदार, मयुरी उन्नटकर आदी उपस्थित होते.          

या निवेदनात म्हंटले आहे कि, संपूर्ण देशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीची परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत असताना कोविड सेंटरमध्ये सुद्धा महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशामुळेच महाराष्ट्रात एकूण महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या वस्तुस्थितीचा आपण गांभीर्याने विचार करावा व महानगरपालिकेबरोबरच उपजिल्हा रूग्णालयाशी योग्य तो संवाद साधून आपल्या अधिकार कक्षेत येणाऱ्या प्रत्येक कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच महिला रूग्णांच्या सुरक्षितेकरीता प्रत्येक कोविड सेंटरमध्ये २४ तास महिला पोलीस कॉन्स्टेबल यांची नेमणूक करण्यात यावी.

त्याचप्रमाणे रात्रीचे वेळेस महिला रूग्णांना कोविड सेंटरमध्ये ऍडमिट करू नये, असे नमूद करून कोविड सेंटरमधील महिला रूग्णांच्या सुरक्षितेसाठी या निवेदनाची दखल घेवून आपण त्वरीत वर नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे. अन्यथा भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशतर्फे या विषयाला अनुसरून राज्यव्यापी आंदोलन छेडावे लागेल याची आपण नोंद घ्यावी, असेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.