खासदार राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त रसायनी परिसरात आदीवासी बांधवांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔶🔷🔷
खासदार राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त रसायनीत युवक कॉंग्रेसच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम पार पडले. यावेळी खासदार राजीव सातव यांच्या चाहत्यांनी रसायनी परिसरातील आदीवासी बांधवांना अन्न धान्यासह किराणा सामानाचे किट वाटप केले.
यावेळी कोरोना पाश्र्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या उपाययोजना आदीवासी बांधवांना समजावून सांगण्यात आले. वाटपप्रसंगी सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन केल्याचे दिसून आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड, जिल्हा सचिव प्रशांत खाने, जिल्हा पदाधिकारी सागर सुखदरे,युवा नेते अक्षय मुंढे,सुरज पाटील,शयान उस्मानी,दिवेश पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान खासदार राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त रसायनीतील खाने आंबिवली येथील युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव प्रशांत खाने यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.जगात नेत्रदान हे एकमेव असे श्रेष्ठ पुण्यकर्म असून जे आपल्या मृत्यूनंतर पुर्ण होते असे प्रशांत खाने यांनी बोलताना सांगितले.शिवाय आपल्या नेत्रदानातून दुसऱ्याला दृष्टी मिळेल असेही ते म्हणाले.







Be First to Comment