Press "Enter" to skip to content

कोरोनामूळे दहावी,बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान

उपाययोजना करण्याची गरज 🔷🔶🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔷🔷🔶🔶


कोरोनामूळे संपूर्ण भारतातील शाळा कॉलेज बंद करण्यात आले असुन यामुळे दहावी,बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचे होणार मोठे शैक्षणिक नुकसान होणार असुन यामुळे शिक्षण मंत्री यांनी यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मार्च २०२० पासून खऱ्या अर्थाने कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला.यामुळे काही परिक्षा रद्द करण्यात आल्या व दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला इतर सर्व विषयाच्या गुणांच्या टक्केवारी नुसार गुण देऊन उत्तीर्ण करण्यात आले होते.गेल्या वर्षी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभ्यास क्रम पुर्ण झाले होते व दहावी बारावीच्या परिक्षा पुर्ण झाल्या होत्या व इतर शालेय परिक्षा रद्द करून त्यांना महामाही परिक्षांच्या आधारे गुण देऊन उत्तीर्ण करण्यात आले होते.

परंतु २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात गेले पाच महिन्यांपासून शाळा कॉलेज सुरू झाले नाही.यामुळे या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम आज पर्यन्त सुरू झाले नाही काही प्राव्हेट क्लास ऑन लाईनवर सुरू आहेत परंतुु खेडेगावात बहुतेक ठिकाणी मोबाईलला रेंज नसल्याने या विद्यार्थ्यांचे अभ्यास होत नाही.तर पाच महिन्यांपासून शाळा कॉलेज सुरू न झाल्याने या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पुर्ण होणे यावर्षी शक्य नाही.यामुळे या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसह पालक वर्ग यांच्या चिंता अधिक वाढल्या असल्याचे दिसत आहेत.

यापुढे शाळा कॉलेज सुरू झाले तरी सर्वच अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य नाही.यामुळे या शैक्षणिक वर्षात ४०% अभ्यासक्रम या परिक्ष मधून वागण्यात यावी या शिवाय इतर काही उपाययोजना कराव्यात की यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही असे विद्यार्थ्यां व पालक वर्गातुन बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.