वाढदिवसातून केली कोरोना विषयक जनजागृती : 700 वाफारा मशीनचे किट ग्रामस्थांना वाटप 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) 🔷🔷🔶🔶
उरण तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी नामवंत व प्रसिद्ध असे विजय विकास सामाजिक संस्थेचे संस्थापक विजय भोईर, विकास भोईर यांचा 41 वा वाढदिवस मंगळवार दि 22/9/2020 रोजी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे नियम पाळत, कोरोना विषयक जनजागृती करत कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाफारा मशीनचे किट नागरिकांना, ग्रामस्थांना वाटप करून जनभावना लक्षात घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथील विजय विकास सामाजिक संस्थे तर्फे नवघर ग्रामपंचायतीमध्ये कोरोना काळ लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय राजाराम भोईर व त्यांचे बंधू प्रसिद्ध उद्योजक विकास राजाराम भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विजय विकास सामाजिक संस्थे तर्फे नवघर ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांना घरोघरी जाऊन एकूण 700 वाफारा मशीन किट वाटण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी घरी रहा, सुरक्षित रहा आणि शासनाचे नियम पाळा, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन एकाच दिवशी जन्मलेल्या दोघ्या जुळ्या भावांनी आपल्या वाढदिवसानिमित्त यावेळी केले.

सातत्याने नेहमी सामाजिक बांधिलकीतून गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवणा-या विजय विकास सामाजिक संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांनी, ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.राजकारणातील उत्तम राजकीय पदाधिकारी कार्यकर्ता, ऍक्टिव्ह जिल्हा परिषद मेंबर म्हणून विजय भोईर यांची रायगड जिल्ह्यात ओळख आहे तर त्यांचे बंधू विकास भोईर हे उद्योग व्यवसायात कार्यरत असलेले उत्तम व्यक्तिमत्व असून उद्योग धंद्यांतही त्यांनी चांगली प्रगती केली आहे.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ह्या दोन्ही जुळ्या भावांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्हाट्सअँप, फेसबुक आदी सोशल मीडियाद्वारेही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.







Be First to Comment